खरीप हंगामात हिरवळीच्या खतांचा वापर
सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना
*✍️ह्या वर्षी पावसाळा उशिरा,सोबतच जुलै महिन्यात पावसाचा खंड पडावयाची शक्यता.यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.कमी कालावधीचे पिकांचे (मुग, उडीद) उत्पादन कमी येईल.कापुस,मका पिके थोडी जास्त कालावधीची आहेत.त्या पिकांना नंतर उशिराचा पाऊस आला तर ठीक.नाहीतर त्याचे उत्पादन कमी.ह्यामुळे कोरडवाहू शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत.💧*
*✍️यात ज्या शेतकऱ्यांची जमीन भारी,म्हणजेच रब्बी हंगाम येईल असे,त्यांनी माझ्या मते हिरवळीचे खत म्हणुन धैंचा हे पिक पेरावे.यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब (जमिनीचा आत्मा, उत्पादकता वाढ, सुपिकता वाढ) वाढेल.जमिनीचा पी एच मेन्टेन होईल.व याचाच परिणाम पुढील रब्बी हंगामातील उत्पादनात वाढ होईल.मागील न आलेल्या उत्पादनाची भर निघेल.व आपल्या जमिनाचा कस सुधारेल.💧*
*✍️दरवर्षी धैंचा हे हिरवळीचे पिक घेऊन ४०/४५दिवसांनी जमिनीत गाळले पाहिजे.याचा चांगला परीणाम जमिनीला मिळत असतो.💧*
*✍️कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नुसार हिरवळीच्या खतामुळे जमीनीची भौतिक परिस्थिती सुधारते,नत्र स्फुरद उपलब्ध होते.पण मी सतत ५/६वर्ष केलेल्या प्रयोगावरुन जमिनीचा सेंद्रिय कर्ब फार मोठ्या प्रमाणावर वाढतो.माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.२८ वरुन ०.९४ झाला.एवढा सेंद्रिय कर्ब कशानेही वाढत नाही.यासोबतच जमिनीचा सामू पण मेन्टेन होतो.माझ्या जमिनीचा सामू ८.२वरुन ७.८झाला.एवढा सामु कशानेही कमी होत नाही.एकाच पिकामुळे दोन्ही फायदे होतात.ह्यामुळे जमिन भुसभुशीत होते,पाण्याचा निचरा चांगला होतो.बियाणेची उगवण चांगली होते.रासायनिक खतांची उपलब्धता वाढते.रासायनिक खते उपलब्ध स्वरुपात आल्याने जमिनीची प्रत सुधारते.सेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीत जिवाणुंची संख्या वाढते.जिवाणु वाढल्याने जमीन जिवंत होऊन उत्पादकता वाढते.💧*
*✍️यामुळे शेतकऱ्यांना आवाहन करतो की,जे शेतकरी रब्बीचे पिके घेऊ शकतील, त्यांनी हिरवळीचे धैंचा हे पिक घेऊन,४०/४५दिवसांनी जमिनीत गाडावे व आपली जमीन सुपीक बनवावी.💧*
💧💧💧💧💧💧💧💧💧💧
Comments
Post a Comment